परिवर्तनासाठी झटणारे तरुण हीच माझी आशा - पन्नालाल सुराणा

राजाराम कानतोडे
मंगळवार, 10 जुलै 2018

सोलापूर : अनेकांच्या प्रयोगातून समाजाचा गाढा पुढे जात असतो. आदिवासी, दलित, शेतकरी आणि गरीबांचे प्रश्‍न शांततेच्या मार्गाने सोडविता येतात. सध्या अनेक ठिकाणीा परिवर्तनासाठी झटणारे तरुण हीच माझी आशा आहे, अशी भावना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी "सकाळ'शी बोलताना मांडली. 

सोलापूर : अनेकांच्या प्रयोगातून समाजाचा गाढा पुढे जात असतो. आदिवासी, दलित, शेतकरी आणि गरीबांचे प्रश्‍न शांततेच्या मार्गाने सोडविता येतात. सध्या अनेक ठिकाणीा परिवर्तनासाठी झटणारे तरुण हीच माझी आशा आहे, अशी भावना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी "सकाळ'शी बोलताना मांडली. 

सोलापुरात सोमवारी त्यांचा 85 व्या वाढदिवसानिमित्त अनौपचारिक कार्यक्रमात निर्मलकुमार फडकुले सभागृहात सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माधुरी सुरवसे, ममता बोल्ली, प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर, श्रीकांत कांबळे, बालमित्र धारुरकर, श्रीकांत धारुरकर, राठोड आदी उपस्थित होते. 

सुराणा वयाच्या नवव्या वर्षापासून आजपर्यंत राष्ट्रसेवादलाशी संबंधीत आहेत. सोशालिस्ट पार्टीचे ते या वयातही सक्रीय कार्यकर्ते आहेत. एसटी कामगार संघटना, बार्शीतील मिल कामगार, आदिवासींचे प्रश्‍न, राजकारणाशिवाय समाजप्रबोधनासाठी संस्थांत त्यांनी सक्रीय सहयोग दिला आहे. बार्शीत झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांना महत्वाचा वाटा होता. लेखक म्हणूनही समाजप्रबोधनात त्यांनी योगदान दिले आहे. 

मला माझ्या मनाप्रमाणे काम करता येत असल्याने मी समाधानी आहे, असे सांगून ते म्हणाले, "देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आर्थिक नियोजनामुळे शिक्षण प्रसार झाल्याने मागास समाजघटकांत परिवर्तन झाले. सध्याचा काळ हा समाजाच्या अभिसराणाचा काळ आहे. जागतिकीकरणाचे कष्टकऱ्यांचे प्रश्‍न तीव्र झाले आहेत. महाराष्ट्रात बीड, बुलढाण्याला अजून रेल्वे नाही. दुसरीकडे अमेरिका, जपानची नक्कल करण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. देशाचा विकास समतोल झाला पाहिजे. डॉक्‍टर भ्रष्टाचारी झालेले दिसतात. सरकारी कर्मचारी काम करत नाहीत. शेतकऱ्यांना बॅंकात नीट वागणूक मिळत नाही, असे असले तरी अनेक ठिकाणी परिवर्तनासाठी तरुणांचे गट कार्यरत आहेत. तीच माझी आशा आहे,'' असे त्यांनी नमूद केले. 

कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिले. पण भाजपने अन्य धर्मियांचा द्वेश करणारे हिंदुत्व लादण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, ते लोकांना मान्य नाही. साधुसंतांचे म्हणणे लोकांना आवडते. पण त्यात इतरांचा द्वेश नसतो. लोक भाजपला त्यांची जागा दाखवतील. 
- पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत

Web Title: youth is fight for change is my hope said pannalal surana