
मंगळवेढा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालत आहे.हा इतिहास तरुणांना माहित आहे मात्र महाराष्ट्र कसा निर्माण झाला ? त्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले हे नव्या पिढीला माहीत नाही. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे समजावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगल कलश यात्रा राज्याच्या सहा विभागातून काढल्याचे प्रतिपादन लतीफ राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे सरचिटणीस लतीफ तांबोळी यांनी व्यक्त केले.