
लग्नसराई संपत आली ः बेरोजगारीमुळे मुलगी मिळेना
झरे (सांगली) : ग्रामीण भागामध्ये सध्या लग्नसराई धूमधडाक्यात सुरू आहे. अनेक तरुणांना नोकरी नसल्याने विवाह जुळवणे अवघड झाले आहे. तरुणांनी शिक्षणाच्या जोरावर पदव्या बहाल केल्या. मात्र बेकारी वाढल्याने पाहिजे, अशी नोकरी मिळेना, त्यामुळे छोकरी पण मिळेना. अशी अवस्था तरुणांची झाली आहे. मुलांच्या बरोबरीने मुली सुद्धा शिक्षण, नोकरी क्षेत्रामध्ये मागे नाहीत. मुलींसुद्धा शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचल्या आहेत. व अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत. त्यामुळे मुलीसुद्धा आपल्या सारखाच नोकरी करणारा मुलगा शोधत आहेत.
अलिकडच्या काळात मुली उच्चपदावर आहेत. तर अनेक मुलींनी वेगवेगळे कोर्स केले असल्याने नोकरी करीत आहेत. त्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना त्यांच्याच सारखा नोकरी करणारा मुलगा हवा आहे. या पसंतीत मुला मुलींनी तिशी ओलंडलेले बघायला मिळत आहे.
सध्याच्या काळामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा वेगवेगळे प्रकारचे कोर्स करून सुद्धा किंवा उच्चशिक्षित शिक्षण घेऊन सुद्धा अनेक तरुणांना नोकरी मिळेना. नोकरी मिळत नसल्याने छोकरी मिळेना, अशी अवस्था झाली आहे. अनेक तरुणांनी तिशी ओलांडली असून तरीसुद्धा लग्नाच्या रेशीमगाठी जुळून येत नाहीत.त्यामुळे लग्न जुळवणे ही एक डोकेदुखी होऊन बसली आहे. लग्नसराईच्या तारखा संपत आल्या तरी सुद्धा लग्ने जुळून येत नाहीत.नोकरी नाही, कामधंदा काही नाही, उच्चशिक्षित असून नोकरी मिळेना अशा अनेक कारणाने लग्न जुळवणे ही तारेवरची कसरत झाली आहे.
हेही वाचा- सांगलीत नविन वर्षात 2200 हून अधिक संस्थांच्या निवडणुका
शेतकऱ्याच्या पोरांची हालत बेकार
लग्नासाठी प्रत्येक मुलगी नोकरीवाला नवरदेव पाहिजे, अशी अपेक्षा बाळगते, मग शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देणार तरी कोण ? हा गंभीर प्रश्न मुलांच्या आई-वडिलांसमोर उभा आहे. मुलगा शेती करतोय म्हटल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांच्या अगोदरच मुलीचा नकार असतो. मग शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न जमणार तरी कसे ? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
संपादन- अर्चना बनगे