Video : धाडसी युवकांमुळे शिराळ्याच्या पाटलांचा वाचला प्राण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

साेशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिआेमुळे घटना खरी की खाेटी याची चर्चाही हाेऊ लागली. अखेर माध्यमांना ही घटना घडल्याचा दुजोरा पोलिसांनी दिला आहे. मात्र त्याबाबतची काहीच ठाेस माहिती उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा पर्यंत नाेंद झालेली नव्हती.

कऱ्हाड : येथील नविन कृष्णा पुलावरून एकाने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन केला. मात्र त्याला दोघांनी उडी टाकून वाचविले. संदीप आनंदराव पाटील (वय 40, रा. शिराळा) असे वाचलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती कराड पाेलिसांनी दिली. 

श्री. पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. त्याबाबत पोलिस ठाण्यात काहीच नोंद नाही. श्री. पाटील यांनी नदीत उडी मारल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ तेथील स्थानिक रहिवासी सागर झावळे आणि बाळू झावळे या दोन युवकांनाही नदीत उडी मारली. लांबपल्ला अंतर पाेहून ते संदीप पर्यंत पाेहचले. दाेघांनी त्यास दाेन्ही बाजूने पकडून हळूहळू पाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी कृष्णा पूलावर जमलेल्या सर्व नागरीकांनी टाळ्या वाजविल्या. दाेन्ही युवकांमुळे संदीप पाटील यांचे प्राण वाचविले. दरम्यान घटनेची नोंद पोलिसांत झालेली नाही. पाटील यांस वाचविताना संबंधित युवकांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अवघ्या काही मिनीटांत माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे घटना खरी की खाेटी याची चर्चाही हाेऊ लागली. अखेर माध्यमांना ही घटना घडल्याचा दुजोरा पोलिसांनी दिला आहे. मात्र त्याबाबतची काहीच ठाेस माहिती उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा पर्यंत नाेंद झालेली नव्हती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Saved a Man Who jumped In Krishna River of Karad