जिल्हा परिषदेच्या तब्बल 88 शाळांना स्वच्छतागृहच नाही 

अजित झळके 
Wednesday, 9 December 2020

जिल्हा परिषदेच्या तब्बल 88 शाळांना स्वच्छतागृहच नसल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी याबाबत माहिती मागवल्यानंतर ही बाब समोर आली. त्यांनी तत्काळ स्वच्छ भारत मिशनमधून ही कामे हाती घ्यावीत आणि वेगाने काम सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 

सांगली : जिल्हा परिषदेच्या तब्बल 88 शाळांना स्वच्छतागृहच नसल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी याबाबत माहिती मागवल्यानंतर ही बाब समोर आली. त्यांनी तत्काळ स्वच्छ भारत मिशनमधून ही कामे हाती घ्यावीत आणि वेगाने काम सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 

शिक्षणिक विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण अध्यक्षा कोरे यांनी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांना पाणीपुरवठ्याबाबत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. आता स्वच्छतागृहांचा विषय ऐरणीवर आणला आहे. जेथे स्वच्छतागृहच नाही, तेथे स्वच्छ भारत मिशनमधून त्याला मंजुरी दिली जाणार आहे. 

जेथे ते खराब आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी दिली जाणार आहे. जेणेकरून शाळांमध्ये भौतिक सुविधा उत्तम दर्जाच्या असल्या पाहिजेत, असे स्पष्ट त्यांनी बजावले आहे. स्वच्छ भारत मिशनमधून एक शौचालय युनिट बांधण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपयांचा निधी दिला जातो. जिल्ह्यात मुलांच्या 51 तर मुलींच्या 37 शाळा आहेत, ज्यांना स्वच्छतागृह नाही. 

शाळा शौचालयाविना.. 
जत तालुका ः 12 मुलांच्या, 20 मुलींच्या; आटपाडी ः 8 मुलांच्या, 6 मुलींच्या; कवठेमहांकाळ ः 4 मुलांच्या, 1 मुलींची; खानापूर ः 4 मुलांच्या; मिरज ः 6 मुलांच्या; पलूस ः 1 मुलांची, 3 मुलींच्या; तासगाव ः 5 मुलांच्या, 2 मुलींच्या; वाळवा ः 9 मुलांच्या, 4 मुलींच्या; कडेगाव ः 2 मुलांच्या, 1 मुलांची शाळा. 

शाळा तेथे स्वच्छतागृह असायलाच हवे. 88 शाळांत ते नाही, हे वेदनादायक आहे. पुन्हा असे होणार नाही, त्यासाठी तत्काळ मंजुरी आणि वेगवान कामाच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, हाच प्राधान्याचा विषय असेल. 
- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilha Parishdechaya Tabbal 88 Shantana Sanitation House