झेडपी मुख्यालय कर्मचाऱ्यांना 27 पासून तीन दिवस "वर्क फ्रार्म होम' 

विष्णू मोहिते
Saturday, 25 July 2020

सांगली, ः कोरोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता झेडपी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी 27 ते 29 जुलै या कालावधीत जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी घरुनच आपल्या विभागाशी सबंधित शक्‍य ते कामकाज पार पाडावे, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी काढला आहे. सांगली जिल्हा परिषदेतील कोरोना नियंत्रण कक्षातील सहा अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला. रोजावाडी येथील 51 वर्षीय माजी उपसरपंच आणि कामळवाडी येथील 57 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 44 वर पोहोचली. जिल्ह्यात नव्याने 166 रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 117 रुग्णांचा समावेश असून त्यामध्ये सांगलीत 74 तर मिरजेतील 43 रुग्णांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात अठरा, शिराळा तालुक्‍यात बारा, मिरज तालुक्‍यात चार, खानापूर व आटपाडी तालुक्‍यात प्रत्येकी एक, पलूस तालुक्‍यात पाच, जत आणि वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी तीन आणि तासगाव तालुक्‍यात दोन रुग्ण आढळले. 

...... 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP HQ staff to be given "work from home" for three days from 27