मन हेलावून टाकणारी घटना! पिंपरीत कुत्र्याला पोत्यात टाकून जाळले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार,  विनोद मुरार यांचा पाळीव कुत्रा बाहेरून फिरुन घरात येताच  त्याच्या तोंडाला फेस येवून तो मृत पावला. अचानक हे कसे काय घडले हे जाणून घेण्यासाठी त्यांनी शोधशोध केली असा त्यांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुरार यांना एका पोत्यात जाळलेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळला तर एक कुत्रा जखमी अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच बरोबर दोन कावेळेही मृत असल्याचे निदर्शनास आले

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी परिसरात एका कुत्र्याचा पोत्यात टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही दिवसांपुर्वीच पिंपरीत एका पाळीव कुत्र्याला चौथ्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच  पुन्हा मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार,  विनोद मुरार यांचा पाळीव कुत्रा बाहेरून फिरुन घरात येताच  त्याच्या तोंडाला फेस येवून तो मृत पावला. अचानक हे कसे काय घडले हे जाणून घेण्यासाठी त्यांनी शोधशोध केली असा त्यांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुरार यांना एका पोत्यात जाळलेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळला तर एक कुत्रा जखमी अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच बरोबर दोन कावेळेही मृत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, हा प्रकार विषप्रयोग केल्याने झाल्याची शंका मुरार यांना वाटली आणि त्यांनी पोलिसांकडे  धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही कुत्र्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील माहिती समोर  येईल. या  प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपुर्वीच पिपंरीतील पिंपळे गुरव भागातील 7 महिन्यांच्या भटक्या कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन फेकून दिल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत एका महिलेने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच प्राणी मित्र संघटना आणि खासदार मेनका गांधी यांनी थेट पोलिसाना संपर्क साधत प्रकरणाचा गांभिर्याने तपास करण्याची विनंती केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog was burned in sack in pimpri