अबब... पोलिस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १ लाख ८९ हजार ७३२ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अबब... पोलिस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १ लाख ८९ हजार ७३२ अर्ज

अबब... पोलिस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १ लाख ८९ हजार ७३२ अर्ज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई पदासाठी आज (शुक्रवारी) लेखी परीक्षा होत आहे. ही परीक्षा सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर होणार असून, यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. पोलिसांकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भरारी पथके कार्यरत आहेत.

हेही वाचा: महापालिकेला 99 लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शुक्रवारी (ता. १९) दुपारी तीन ते साडे चार या वेळेत लेखी परीक्षा घेतली जात आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद येथील ४४४ केंद्रांवरील सात हजार ३८४ परीक्षा हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एक अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ उपायुक्त, २५ सहायक आयुक्त, १७७ निरीक्षक, ६३६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक १२ हजार ८३८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. केंद्रावर व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. केंद्रावर कडक तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना काय काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरारी पथके सर्व केंद्रावर फिरणार आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे देशांमध्ये परत आणावेत ; चंद्रकांत पाटील

जिल्हा केंद्रांची संख्या

 • पुणे - २१७

 • नागपूर - ४७

 • औरंगाबाद - ७७

 • सोलापूर - २५

 • अहमदनगर - ४७

 • नाशिक - ३१

 • एकूण - ४४४

पुणे जिल्ह्यातील केंद्र

 • पिंपरी चिंचवड - ८०

 • पुणे शहर - १२२

 • पुणे ग्रामीण - १५

 • एकूण - २१७

 • जागा - ७२०

उमेदवार - एक लाख ८९ हजार ७३२

परीक्षेचा दिनांक - १९ नोव्हेंबर

वेळ - दुपारी तीन ते साडे चार

ठिकाण - पुणे, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यात

एकूण केंद्र - ४४४

बंदोबस्त - १२ हजार ६९६ अधिकारी, कर्मचारी

loading image
go to top