दिवाळीच्या दिवशी घडली दुर्घटना! पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

 शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास विराज खेळत असताना पाण्याच्या टाकी जवळ गेला व टाकीत पडला. खूप वेळ होऊनही विराज न दिसल्याने त्याच्या वडिलांनी विराजचा शोध घेतला. पाण्याच्या टाकीत पाहिले असता विराज टाकीत दिसून आला.

पिंपरी : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.13) दुपारी भोसरी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विराज सुनील मोरे (वय 1 वर्ष 8 महिने, रा. सत्यनारायण हौसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विराज यांच्या घराच्या मागील बाजूस पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टाकीला कोणत्याही प्रकारचे झाकण लावलेले नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास विराज खेळत असताना पाण्याच्या टाकी जवळ गेला व टाकीत पडला. खूप वेळ होऊनही विराज न दिसल्याने त्याच्या वडिलांनी विराजचा शोध घेतला. पाण्याच्या टाकीत पाहिले असता विराज टाकीत दिसून आला. त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 year 8 Months old Boy dies after falling into water tank in Pimpri