देहूतील गाथा मंदिरात आढळले 10 जण कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

दिवसेंदिवस देहू नगरपंचायतीच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने येथील गाथा मंदिरात दहाजण बाधित आढळले आहेत.

देहू : दिवसेंदिवस देहू नगरपंचायतीच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने येथील गाथा मंदिरात दहाजण बाधित आढळले आहेत. त्यामुळे ते मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. देहूतील आतापर्यंत बाधितांची संख्या ३४ वर गेली असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित कांबळे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देहू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सध्या या ठिकाणी मावळचे तहसीलदारांना प्रभारी अधिकारी म्हणून पदभार दिला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे. दररोज हजारो भाविक देहूत दर्शनासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवसांपासून गाथा मंदिरात भाविकांची गर्दी होती. त्यामुळे गाथा मंदिरातील काही कामगार कोरोनाबाधित आढळलेले आहेत. त्यामुळे मंदिर बंद केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. रणजित कांबळे म्हणाले, ‘‘गाथा मंदिरातील बारापैकी दहा जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आलेला आहे. नगरपंचायत प्रशासनाला प्राथमिक आरोग्य केंद्राने पत्र देवून खबरदारी घेण्याचे कळविले आहे.’’ गाथा मंदिराचे पानसरे म्हणाले, ‘‘गेल्या पाच दिवसांपासून गाथा मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. मंदिरातील काही कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. दिवसातून तीनवेळा त्यांची वैद्यकीय तपासणी होत आहे.’’ नगर पंचायतीचे लेखनिक महेश वाळके म्हणाले, ‘‘देहूत विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मात्र, पोलिस बंदोबस्त मिळत नाही.’’ प्रभारी अधिकारी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 corona infected people found in dehu gatha temple