11th Class Admission
Sakal
पिंपरी-चिंचवड
11th Class Admission : अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत ६५ टक्के प्रवेश, ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतीक्षेत; शहरात हजारो जागा रिक्त
FYJC Problem : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडचणीमुळे हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशासाठी वाट पाहत असून, पालक व महाविद्यालयांनी पारंपरिक पद्धतीने प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
पिंपरी : दहावीचा निकाल लागून दोन महिने उलटले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत एकूण ६५ टक्के प्रवेश झाले असून, शहरातील हजारो जागा रिक्त असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तत्काळ बंद करून पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

