विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम महाविद्यालयांकडे पडून

राज्यातील ७५ तंत्र शिक्षण महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे.
money Transfer
money Transferesakal
Summary

राज्यातील ७५ तंत्र शिक्षण महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी - राज्यातील ७५ तंत्र शिक्षण महाविद्यालयांकडे (Colleges) विद्यार्थ्यांनी (Students) परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम (Deposit Amount) पडून असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असल्याने आर्थिकदृष्ट्या मागास विकास विद्यार्थ्यांसाठी या रकमेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना काही रक्कम तारण अनामत रक्कम भरावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयातून बाहेर पडतो. त्यावेळी ही रक्कम त्या विद्यार्थ्यांना तत्काळ परत देणे असते. कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी माहिती अधिकाराअंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या भागातील ७५ तंत्र शिक्षण महाविद्यालयांत अर्ज करून अनामत रकमेची माहिती संकलित केली आहे.

त्यानुसार संबंधित ७५ महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटी १२ लाख ५०हजार ९३७ रुपयांची रक्कम पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही वेळा विद्यार्थ्यांना ही रक्कम परत दिली जात नसल्यामुळे ती महाविद्यालयाकडे पडून राहते. त्या रक्कमेचा विनियोग कसा करावा, याबाबत राज्य सीईटी सेल प्रवेश नियमावलीच्या पुस्तकात माहिती दिली आहे. त्या रक्कमेचा विनियोग गरजू इबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणे आवश्यक आहे.

इबीसी विद्यार्थी पैसे अभावी व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य करणे अपेक्षित आहे.

अंमलबजावणी करण्याची मागणी

वसतिगृह व मेस शुल्क, शैक्षणिक साहित्य-वह्या, पुस्तके, दफ्तर, वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे. या चार घटकांवर महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित १८०० महाविद्यालय (तंत्र शिक्षण) शिल्लक असलेली एकूण अनामत रकमेच्या ३० टक्के रक्कम ईबीसी विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याबाबतचे परिपत्रक तत्काळ काढून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व डॉ. अभय वाघ (संचालक, तंत्र शिक्षण) यांच्याकडे केली आहे.

दृष्टिक्षेपात

  • एकूण तंत्र शिक्षण महाविद्यालयाची संख्या-१२६

  • विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतलेल्या एकूण महाविद्यालयाची संख्या-७५

  • विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम न घेतलेल्या महाविद्यालयांची संख्या-५१

  • विद्यार्थ्यांना परत न केलेली एकूण अनामत रक्कम-१२,१२,५०,९३७

प्रभावी अंमलबजावणी होत नाही

शिल्लक अनामत रक्कम अनुदान निर्धारणाच्या वेळी उत्पन्नाची बाब म्हणून विचारात घेऊन ती वेतनेतर अनुदानातून वजा करून अनुदान अदा करण्यात येईल, आणि शिल्लक अनामत रकमेचा तपशील वेतन देयक सादर करताना सादर करण्याचे परिपत्रक सहसंचालक विभागाने काढले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांकडे पडून असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेचा गैरवापर होऊ नये, यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या रकमेचा करण्यात यावा. त्या संदर्भातील परिपत्रक उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com