
शहरातील दोन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील एक हजार 764 व बाहेरील 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडहून आलेले सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पिंपरी - शहरात मंगळवारी 140 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 175 झाली आहे. 71 जणांना डिस्चार्ज मिळाला. 93 हजार 801 रुग्ण बरे झाले असून सध्या एक हजार 610 सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे महापालिकेच्या शाळांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर
आज शहरातील दोन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील एक हजार 764 व बाहेरील 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडहून आलेले सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने स्ट्रेन तपासणीसाठी (नवीन कोरोना) पाठविले आहेत. त्यातील दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, पाच जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहेत. सध्या महापालिका रुग्णालयांत 693 रुग्ण उपचार घेत आहेत. 917 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 690 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. 814 जणांचे विलगीकरण केले.
साठ वर्ष जे झाले नाही ते यंदा घडले ; पिसे ग्रामपंचायतमध्ये प्रथमच बिनविरोध निवडणूक