मावळात आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, एकूण आकडा पाहा

मावळात आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, एकूण आकडा पाहा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा उचल खाल्ली. दिवसभरात तब्बल १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तळेगाव येथील सात, सुदुंबरे येथील सहा; तर वडगाव, साते, दहिवली व देवले येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २७९ झाली आहे. त्यात शहरी भागातील १०४, तर ग्रामीण भागातील १७५ जणांचा समावेश आहे. 

तळेगावात सर्वाधिक ७७, लोणावळा येथे १८, तर वडगाव येथे रुग्ण संख्या नऊ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, १०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी दहा जणांना घरी सोडण्यात आले. सध्या सक्रिय असलेल्या १६५ रुग्णांपैकी ८५ जण लक्षणे असलेले, तर ८० जण लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे असलेल्या ८५ जणांपैकी ७० जणांमध्ये सौम्य स्वरूपाची व १२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण अत्यवस्थ आहेत. सध्या १२१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, ४४ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com