आयटी परिसराची चिंता वाढविणारी बातमी; दोन दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा 'एवढा' वाढला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पाच गावांमध्ये गेले दोन दिवसांत तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, हा परिसर आता रेड झोनच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे.

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पाच गावांमध्ये गेले दोन दिवसांत तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, हा परिसर आता रेड झोनच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील तब्बल 38 जणांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती माण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, तालुक्यातील रुग्ण संख्या शंभरच्या पुढे गेल्याने मुळशीकरांची चिंता अधिक वाढली आहे. विशेष बाब म्हणजे तालुक्यातील रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी एकही शासकीय रुग्णालय नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कुठे न्यायचे, हा सर्वांत मोठा गंभीर प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांसमोर उपस्थित होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारण मुळशीत केवळ सिम्बॉयसिसचे नांदे येथे ६०० बेडचे खासगी रुग्णालय असून, तेथे बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून भरमसाट पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. या रुग्णालयासोबत पुणे महापालिकेने करार केला असून, पुण्याच्या हद्दीतील रुग्णांवरच मोफत उपचार केले जात असल्याने मुळशीकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तर, औंध येथील जिल्हा उपरुग्णालयात केवळ 30 बेड उपलब्ध असल्याने मुळशीतील रुग्णांवर उपचार करायचे कुठे, हा सर्वांत मोठा  प्रश्न उपस्थित झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) मिळून गावनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : हिंजवडी- 5, नेरे- 3, जांबे- 2, माण- 4, मारुंजी- 4


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 corona positive patients were found in two days in IT park