पिंपरीत आज आढळले 193 कोरोना पॉझिटीव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 193 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 850 झाली आहे.

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात आज 193 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 850 झाली आहे. आज 334 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 110 झाली आहे. सध्या दोन हजार 240 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात आणि शहराबाहेरील चार अशा 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 492 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 614 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चऱ्होली (वय 79), दापोडी (वय 57), चिंचवड (वय55), दिघी (वय 56). महिला चिंचवड (वय 94 व 60), भोसरी (वय 60) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सातारा (वय 82), चाकण (वय 49 व 58), शिवणे (वय 43) येथील रहिवासी आहेत. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात एक हजार 314 पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत 12 लाख 92 हजार 840 जणांचे सर्वेक्षण केले. दोन हजार 858 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 103 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 193 corona positive patients found in Pimpri today