Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 20 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 80 हजार 480 झाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 80 हजार 480 झाली. त्यातील 73 हजार 671 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार 448 रुग्ण सक्रिय आहेत. आज 544 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 691 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 361 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आज मृत्यू झालेल्या शहरातील 13 व बाहेरील सात अशा 20 जणांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी मृत्यू झालेले शहरातील पुरुष चऱ्होली (वय 40), चिंचवड (वय 62 व 32), पिंपळे गुरव (वय 36, 60 व 61), पिंपरी (वय 70), पिंपळे निलख (वय 72), रावेत (वय 66) आणि महिला चिखली (वय 75), दापोडी (वय 62), पिंपळे सौदागर (वय 57), निगडी (वय 89) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सहकारनगर (वय 78), जुन्नर (वय 63), खडकवासला (वय 57), आंबेगाव (वय 77), भोर (वय 62) आणि महिला जुन्नर (वय 48), विश्रांतवाडी (वय 52) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजपर्यंत बारा वर्षांखालील सहा हजार 160 मुलांना संसर्ग झाला आहे. 13 ते 21 वयोगटातील सहा हजार 697 युवक, 22 ते 39 वयोगटातील 30 हजार 434 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 24 हजार 554 प्रौढ आणि साठ वर्षांवरील 10 हजार 654 ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 79 हजार 296 जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 17 हजार 604 जण होम क्वारंटाइन आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वेक्षणात 434 पॉझिटिव्ह 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसांत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 21 लाख 31 हजार 256 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार 854 नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 434 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

सर्वेक्षण दहा ऑक्‍टोबरपर्यंत चालणार 

सर्वेक्षणाचा पहिला टप्पा दहा ऑक्‍टोबर रोजी पूर्ण होणार आहे. 14 ऑक्‍टोबर ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा होईल. या कालावधीत घरी आलेल्या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 deaths due to corona in pimpri chinchwad on sunday 4 october 2020