पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी; कोरोनामुक्‍तांचा आकडा २ हजार पार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापपर्यंत 22 हजार 63 कोरोनाबाधित आढळले असून 439 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्‍त रूग्णांची संख्या वाढत असून शनिवारी (ता.1) तब्बल दोन हजार 107 जण कोरोनामुक्त झाले. तर दिवसभरात शहरातील 870 आणि शहराबाहेरील 33 असे एकूण 903 जण कोरोना बाधित आढळले. कोरोनामुळे शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील 18 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 15 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. 

सावधान! बोगस ऑनलाइन भाडेकरार दस्त करणारी टोळी राज्यात सक्रिय​

मृत्यू झालेल्यांमध्ये काळेवाडीतील 53, 60 व 70 वर्षीय महिला, पिंपरीतील 38 वर्षीय पुरूष, निगडीतील 80, 48 वर्षीय पुरुष, मोशीतील 65 वर्षीय पुरुष, मिलिंदनगर येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळे गुरवमधील 80 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 47 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, चिखलीतील 42 वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडीतील 26 वर्षीय पुरुष, रहाटणीतील 65 वर्षीय पुरुष, खेडमधील 55, 72, 58 वर्षीय पुरुष, पुण्यातील विशालगड येथील 57 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापपर्यंत 22 हजार 63 कोरोनाबाधित आढळले असून 439 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक; शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

आजचा वैद्यकीय अहवाल :
* दाखल झालेले संशयित रुग्ण - 4357 
* पॉझिटीव्ह रुग्ण -903 
* निगेटीव्ह रुग्ण -3630 
* चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण - 1226 
* रुग्णालयात दाखल एकूण संख्या - 3553 
* डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण - 4262 
* कोरोनामुक्त झालेले रूग्ण - 2107 
* आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 439 
* आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -14682 
* दैनंदिन भेट दिलेली घरे -24276 
* दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या -78009 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2107 people successfully defeated corona in Pimpri Chinchwad