पिंपरी-चिंचवड शहरात आज 22 मृत्यूंची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

  • शहरातील 15 मृत्यू व सात जण शहराबाहेरील रहिवासी 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 812 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 76 हजार 79 झाली आहे. आज 914 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 67 हजार 296 झाली आहे. सध्या सात हजार 503 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 15 आणि शहराबाहेरील सात अशा 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 280 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 474 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पिंपरी (पुरुष वय 58), आकुर्डी (पुरुष वय 71), भोसरी (पुरुष वय 70, 75 व 67), दिघी (पुरुष वय 56 व 55), काळेवाडी (पुरुष वय 65), निगडी (पुरुष वय 56 व 73), वाल्हेकरवाडी (पुरुष वय 74), चऱ्होली (स्त्री वय 74), सांगवी (स्त्री वय 61), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष वय 48), चिखली (पुरुष वय 54) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक चाकण (पुरुष वय 49), जुन्नर (पुरुष वय 45 व स्त्री 78), खेड (पुरुष वय 53 व स्त्री 60), येरवडा (स्त्री वय 46) आणि बेल्हे (पुरुष वय 65) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 corona deaths in pimpri chinchwad on sunday 27 september 2020

Tags
टॉपिकस