esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये २४० नवीन रुग्ण; आजपर्यंत शहरातील ४२१७ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पिंपरी-चिंचवडमध्ये २४० नवीन रुग्ण; ४४२ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - शहरात शनिवारी २४० रुग्ण (Corona Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५३ हजार ७१३ झाली आहे. आज ४४२ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४७ हजार १७६ झाली आहे. (240 New Corona Patients Found in Pimpri Chinchwad)

सध्या दोन हजार ३२० सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ७५५ रुग्ण उपचार घेत आहेत. ५६५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

हेही वाचा: लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी; कोरोनाचा पडला विसर

आजपर्यंत पाच लाख २६ हजार ५६५ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ९१ मेजर व ६५० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९१३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ३२८ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image