पिंपरी-चिंचवडमध्ये आज 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 962 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 35 हजार 397 झाली आहे. आज 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 24 हजार 981 झाली आहे. सध्या 9792 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 624 झाली आहे. 

आज मयत झालेल्या व्यक्ती नवी सांगवी (पुरूष वय ७५), चिंचवडगाव (पुरूष वय १९), निगडी (पुरूष वय ७१), भोसरी (पुरूष वय ८८), रूपीनगर (पुरूष वय ४३), जुनी सांगवी (पुरूष वय ३७), वाकड (पुरूष वय ७०), वाकड* (पुरूष वय ७४), संत तुकारामनगर, पिंपरी (पुरूष वय ८९), अजमेरा कॉलनी, पिंपरी (पुरूष वय ६३), अजमेरा कॉलनी, पिंपरी (पुरूष वय ८१),  दापोडी (पुरूष वय ८०), दापोडी (पुरूष वय ५०), दिघी (पुरूष वय २४), चिंचवड (पुरूष वय ४७), चिंचवड (पुरूष वय ७५),  बोपखेल (पुरूष वय ७८), पिंपळे गुरव (पुरूष वय ६४), निगडी (स्त्री वय ६५), निगडी (स्त्री वय ६५), मोरेवस्ती चिखली (स्त्री वय ७५), काळेवाडी (स्त्री वय ६०), काळेवाडी (स्त्री वय ७०), मोशी (स्त्री वय ६५), पिंपळे निलख (स्त्री वय ८०) येथील रहिवासी आहे

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com