- बेलाजी पात्रे
वाकड - आयटीयन्सची वसाहत असलेले वाकड परिसर गेल्या २५ तासाहून अधिक काळ अंधारात आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आयटी अभियंत्यांचे कामकाज ठप्प झाले असून विजेवर चालणारी उपकरणे निष्प्रभ ठरल्याने दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. रहिवासी पुरते हैराण झाले असून महावितरण नेमकं करतय काय असा संतप्त सवाल रहिवासी करत आहेत.