पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४३ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४३ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४३ नवीन रुग्ण

पिंपरी - कोरोना संसर्ग झालेले ४३ रुग्ण बुधवारी शहरात आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७६ हजार ८९४ झाली आहे. आज ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७२ हजार ७२१ झाली आहे. सध्या ४०२ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ५०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयांत २३१ रुग्ण उपचार घेत आहेत. १७१ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २४ लाख ३५ हजार ९७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १५ मेजर व २५३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ३३३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. ९७३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top