esakal | मावळात दिवसभरात ४५ जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात दिवसभरात ४५ जणांना डिस्चार्ज

मावळ तालुक्यात रविवारी २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दिवसभरात ४५ जणांना घरी सोडण्यात आले.

मावळात दिवसभरात ४५ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दिवसभरात ४५ जणांना घरी सोडण्यात आले. एकूण रुग्ण संख्या एक हजार ३८६ झाली आहे. त्यातील सुमारे ६८ टक्के म्हणजे ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २४ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १३, वडगाव येथील चार, वराळे व नायगाव येथील प्रत्येकी दोन; तर लोणावळा, कामशेत व गहुंजे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ३८६ झाली असून, त्यात शहरी भागातील ७०५ तर ग्रामीण भागातील ६८१ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४५३, लोणावळा येथे १४७, तर वडगाव येथील रुग्ण संख्या १०५ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ४५ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३९६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २७५ जण लक्षणे असलेले व १२१ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २७५ जणांपैकी १८९ जणांमध्ये सौम्य, तर ६८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १८ जण गंभीर आहेत. सध्या ३९२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून चार जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.