Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’ योजनेतून ४५ लाखांची वीज बिलात बचत

महावितरणच्या गो-ग्रीन योजनेत पिंपरी-चिंचवड शहरातील ३७ हजार ५४० वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे.
go green scheme
go green schemeSakal

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - महावितरणच्या गो-ग्रीन योजनेत पिंपरी-चिंचवड शहरातील ३७ हजार ५४० वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्‍यांना वार्षिक वीज बिलात ४५ लाख चार हजार आठशे रुपयांची बचत झाली आहे. या ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी आता केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’द्वारे बिल प्राप्‍त होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महावितरणने हा उपक्रम राबविला आहे.

पर्यावरण संवर्धन जतन करण्यासाठी महावितरणने पाऊल उचलले आहे. पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे महावितरणने ‘गो-ग्रीन’ योजनेचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन केली जाते. ज्‍यावेळी आवश्यकता असेल तेव्हाच वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्‍यावतीने करण्यात आले होते.

त्‍यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील ३७ हजार ५४० वीज ग्राहकांनी या योजनेत आपला सहभाग दर्शविला आहे. महावितरणच्‍या भोसरी आणि पिंपरी विभागातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यक भागातील वीज ग्राहकांचा यात समावेश आहे. सहभाग घेतलेल्‍या वीज ग्राहकांची वार्षिक वीज बिलातून ४५ लाख चार हजार आठशे रुपयांची बचत झाल्‍याची नोंद आहे.

संकेतस्‍थळावर मिळणार वीज बिल

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. या योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

अशी मिळणार सवलत

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची वीजबिलांमध्ये बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना

‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरित लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे.

जनजागृतीची गरज

महावितरण विभागाकडून सुरू केलेली ग्रो ग्रीन योजना अद्याप बहुतांश वीज ग्राहकांपर्यंत पोचली नाही. या योजनेत सहभागी व्‍हायचे असेल तर कसे व्‍हायचे, या बाबत वीज ग्राहकांना माहिती नाही. त्‍यामुळे योजनेबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.

महावितरणच्‍यावतीने ‘ग्रो ग्रीन’ योजना राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ३७ हजार ५४० वीज ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्‍यांना वार्षिक वीज बिलात सवलत दिली जाते. सहभागी वीज ग्राहकांना ४५ लाख चार हजार आठशे रुपयांची वार्षिक वीज बिलात बचत झाली आहे. अधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होणे आवश्‍यक आहे.

- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

शहरातील वीज ग्राहक

  • घरगुती वीज ग्राहक

  • भोसरी विभाग - ३ लाख ३७ हजार ४७१

  • पिंपरी विभाग - ४ लाख ०९ हजार ८२३

  • वाणिज्यक वीज ग्राहक

  • भोसरी विभाग - ३४ हजार १०४

  • पिंपरी विभाग - ४५ हजार ३२६

  • औद्योगिक वीज ग्राहक

  • भोसरी विभाग - १६ हजार ८४२

  • पिंपरी विभाग -२ हजार ८०४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com