महिलांना सामान्यकरात ५० टक्के सवलत; महापालिकेचा निर्णय

महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतींवर २०११-१२ पासून सामान्य करात ५० टक्के सवलत दिली जात आहे.
PCMC
PCMCSakal
Summary

महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतींवर २०११-१२ पासून सामान्य करात ५० टक्के सवलत दिली जात आहे.

पिंपरी - महिलांच्या (Women) नावे असलेल्या निवासी मिळकतींवर (Property) २०११-१२ पासून सामान्य करात (General Tax) ५० टक्के सवलत (Concession) दिली जात आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी २०२१-२२ पर्यंत इतर कुठल्याही मालमत्ताकरात (Property Tax) सवलत मिळत नसल्याचे प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर करावा लागत होता. ही कार्यपद्धती बदलून जुन्या मिळकतींना सामान्यकरात ५० टक्के सवलत लागू केली होती. ही सवलत २०२२-२३ या वर्षासाठीही कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

मिळकतकर ऑनलाइन भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. त्याचा लाभ एक लाख ५३ हजार २०६ मिळकतधारकांनी घेतला. ही एकूण रक्कम १२ कोटी ७४ लाख आहे. शौर्यपदक धारकांनाही सूट दिली जाते. शहरातील सात मिळकतींना एक लाखाची सूट दिली आहे. ३७ हजार ५०८ मिळकतधारकांनी मुदतीपूर्वी बिल भरून एक कोटी ५५ लाखांची सवलत मिळविली आहे. दिव्यांगांसाठीच्या योजनेचा ५९१ जणांनी लाभ घेतला आहे. शहरातील एकाही हरित मिळकतीस (ग्रीन बिल्डींग) सूट दिली गेली नाही. २०२१-२२ या आर्थिक वर्षांत दोन लाख एक हजार २१६ मिळकतधारकांना १७ कोटी ८६ लाखांची सवलत दिली आहे. त्यांच्याकडून एकूण २५२ कोटी रुपयांचा करभरणा झाला आहे. चालू वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांना दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम एकरकमी ३० जूनपर्यंत भरता येईल.

प्रामाणिकपणे दरवर्षी मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना तीन वर्षाचे ब्लॉक नंतर चौथ्या वर्षी सामान्य करात दोन टक्के सवलत संपूर्ण वर्षासाठी दिली जाते. माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत स्वयंस्फूर्तीने कर भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत दिले जाते. स्वच्छाग्रह चालू साफ सफाई कराच्या ऑन साइट कंपोस्टींग २० टक्के, ऑनसाईट कंपोस्टींग व एसटीपी प्लॅंट असल्यास ३० टक्के, झिरोगार्बेज व एसटीपी प्लॅंट असल्यास ५० टक्के सवलत दिली जाते. थकबाकीसह एक रकमी मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन पेमेंट गेट-वेद्वारे करणाऱ्या मालमत्ताधारकास चालू आर्थिक वर्षाचे सामान्य करात जून अखेर पाच टक्के, जुलै ते मार्च अखेरपर्यंत दोन टक्के सवलत आहे.

मालमत्ता कर सवलत योजना...

  • स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांचे पत्नीस फक्त एका निवासी घरास - ५० टक्के

  • फक्त महिलांचे नाव असलेल्या एका निवासी घरास - ५० टक्के

  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व - ५० टक्के

  • संपूर्ण निवासी मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरल्यास - १० टक्के

  • संपूर्ण बिगरनिवासी, व्यापारी व मोकळ्या जमिनीस - ५ टक्के

  • ग्रीन बिल्डिंग रेटिंगनुसार - ५ ते १५ टक्के

  • शौर्यपदक, माजी सैनिकांच्या विधवा, अविवाहित शहीद सैनिक - १०० टक्के

दृष्टिक्षेपात मालमत्ता व लाभ...

  • एकूण मिळकती - ५ लाख ७१ हजार

  • २०२१-२२ मधील लाभार्थी - ७ हजार ९९२

  • एकूण रक्कम जमा - २ कोटी २ लाख

  • माजी सैनिक लाभार्थी - १ हजार ९१२

  • एकूण सवलत - १ कोटी ४१ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com