पिंपरी : पार्किंग समस्या सोडविण्यासाठी ५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची माहिती
cctv
cctvSakal

पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी व रस्त्यांचा विचार करता पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे शहरात विविध ठिकाणी बसवण्याचा मानस आहे. त्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणेसाठी प्रत्येकी एक असे दोन स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केले जातील, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.

शहरातील पार्किंग समस्येवर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत वाघ बोलत होते. नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहायक नगररचना उपसंचालक प्रशांत शिंपी, सहायक आयुक्त शितल वाकडे, पोलिस निरीक्षक सुनील पिंजण, विजया कारंडे, प्रसाद गोकुळे, दीपक साळुंखे यांच्यासह अर्बन वर्क्स, सेप्ट युनिवर्सिटी, अर्बन लॅब या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले, ''वाढत्या नागरिकरणामुळे शहरात अनेक समस्या आणि आव्हाने निर्माण झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात दळणवळण, रहदारीचे वाढते प्रमाण विचारात घेणे आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे २७ लाख आहे. २०४१ मध्ये लोकसंख्येपेक्षा शहरात वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पार्किंगचा विचार करावा लागणार आहे. यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. विकास आराखडा तयार करताना पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवली जात आहे. गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंगचा अधिक वापर कसा करता येईल, याबाबत उपाययोजना करण्याचाही विचार आहे.''

- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

शहरातील पार्किंग समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करून दळणवळण सुव्यवस्थित करण्यासाठी नियोजन केले जाईल. दळणवळण विषयक व्यवस्थापन केले जाईल. सर्व यंत्रणांनी समन्वयाने पार्किंग समस्यवर दीर्घकालीन मार्ग शोधल्यास शहराच्या विकासाबरोबर पार्किंगचा प्रश्न देखील सहजतेने सुटेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com