esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaPatient

पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील १३७ खासगी रुग्णालयांना (Private Hospital) कोरोना रुग्णांवर (Corona Patient) उपचार (Treatment) करण्यास परवानगी (Permission) होती. आता रुग्णसंख्या घटल्याने पाच रुग्णालयांत एकही रुग्ण नाही. १३२ रुग्णालये मिळून केवळ ५०२ रुग्ण आहेत. (502 Corona Patients in Pimpri Chinchwad Private Hospital)

गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून रुग्ण वाढीस सुरुवात झाली होती. महापालिकेच्या रुग्णालयांसह जम्बो रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्येही बेड शिल्लक नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील १३७ खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली होती. साधारणतः नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या घटू लागली. मात्र, गेल्या मार्चपासून पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली होती. खासगी रुग्णालयेसुद्धा फुल्ल झाले होते. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पुन्हा रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

सद्यःस्थितीत १३२ रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची एकूण बेड क्षमता पाच हजार २९६ आहे. मात्र, त्यातील चार हजार ७९४ बेड रिकामे आहेत. यात ऑक्सिजन सुविधा नसलेले, ऑक्सिजन असलेले, आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या बेडचा समावेश आहे. सोमवारी (ता. १४) सायंकाळपर्यंत केवळ ५०२ रुग्णांवर उपचार सुरू होते.

loading image