esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात शनिवारी ६४१ रुग्ण (Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४६ हजार ५४ झाली आहे. आज पाच हजार ३७४ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ३४ हजार ३९२ झाली आहे. (641 New Corona Patients in Pimpri Chinchwad)

सध्या सात हजार ८०० सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील तीन हजार ८६२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत चार हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत. तीन हजार ३५२ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत चार लाख ७३ हजार ३८५ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २१७ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार ५९३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार ४८७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. नऊ हजार १२५ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image