पिंपरी-चिंचवड शहरात आज 760 नवे रुग्ण; तर 23 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 760 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 64 हजार 382 झाली. आज शहरातील 459 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 760 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 64 हजार 382 झाली. आज शहरातील 459 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 50 हजार 438 झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज 23 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 17 व शहराबाहेरील सहा जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत्यू संख्या एक हजार 62 झाली आहे. सध्या नऊ हजार 809 रुग्ण सक्रिय आहेत. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

आज मृत झालेल्या व्यक्ती भोसरी (स्त्री वय 80), बिजलीनगर (पुरुष वय 58), कासारवाडी (पुरुष वय 71), जुनी सांगवी (स्त्री वय 71), सिंधुनगर (स्त्री वय 58), मोरेवस्ती (पुरुष वय 78), जाधववाडी (पुरुष वय 71), निगडी (पुरुष वय 45), मोशी (पुरुष वय 75), पिंपळे गुरव (पुरुष वय 52 व 85), पिंपळे निलख (स्त्री वय 72), पिंपळे सौदागर (पुरुष वय 72), पिंपरी (स्त्री वय 35), नवी सांगवी (स्त्री वय 65), काळेवाडी (पुरुष वय 70 व 40), आंबेगाव (पुरुष वय 76), राजगुरूनगर (पुरुष वय 61), कसबा पेठ (स्त्री वय 71), शिरवळ (पुरुष वय 78), खेड (पुरुष वय 60) आणि शिक्रापूर (पुरुष वय 53) येथील रहिवासी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 760 new corona patients in Pimpri-Chinchwad today