Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचा 85 हजारांचा आकडा पार

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचा 85 हजारांचा आकडा पार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 228 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 114 झाली आहे. आज 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 80 हजार 752 झाली आहे. सध्या दोन हजार 898 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात आणि शहराबाहेरील पाच, अशा 12 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 464 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 596 झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष पिंपरी (वय 72), भोसरी (वय 42), चिंचवड (वय 75). महिला सांगवी (वय 60 व 61), थेरगाव (वय 55), काळेवाडी (वय 50) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष आळंदी (वय 62), जुन्नर (वय 57 व 65), शेंडेवाडी (वय 60). महिला शिवाजीनगर (वय 62) येथील रहिवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले आहेत. गेल्या दोन दिवसांत तीन लाख 15 हजार 459 नागरिकांची तपासणी केली. त्यात 336 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 36 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com