मावळात दिवसभरात ८६ नवे पॉझिटिव्ह, तर चौघांचा मृत्यू

ज्ञानेश्वर वाघमारे
Sunday, 6 September 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. रविवारी दिवसभरात ८६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित चार जणांचा मृत्यू झाला. शिळाटणे येथील ८१ वर्षीय पुरुष, धामणे  येथील ७३ वर्षीय महिला, सुदुंबरे येथील ४४ वर्षीय पुरुष व कान्हे येथील ६५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३७४ झाली असून, आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू  झाला आहे. एक हजार ६४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ८६ जणांमध्ये लोणावळा व तळेगाव दाभाडे येथील प्रत्येकी २६, कामशेत येथील ११, वराळे येथील सात, इंदोरी येथील पाच, वडगाव येथील चार, माळवाडी येथील दोन; तर शिळाटणे, कान्हे, सुदुंबरे, नवलाख उंब्रे व काले येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार ३७४ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ३०९, तर ग्रामीण भागातील एक हजार ६५ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ७८४, लोणावळा येथे ३६६, तर वडगाव येथे रुग्णसंख्या १५९ एवढी झाली आहे. आतापपर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ६४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ६१ जणांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या तालुक्यात ६३२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३५६ जण लक्षणे असलेले, तर २७६ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३५६ जणांपैकी २५१ जणांमध्ये सौम्य तर ८८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १७ जण गंभीर आहेत. सध्या ६३२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 86 new corona positives and four deaths in maval