Corona Updates : मावळ तालुक्यात आज नीचांकी रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

  • मावळ तालुक्यात दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची व सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची व सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. मंगळवारी (ता. 10) दिवसभरात नीचांकी तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या सात जणांना घरी सोडण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या सात हजार ५३८ झाली आहे. आतापर्यंत २१२ जणांचा मृत्यू झाला असून, सात हजार २४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील कोरोना मुक्तीचे प्रमाण ९६ टक्क्यांवर गेले असून, मृत्यूंचे प्रमाण शेकडा २.८ वर आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तीन जणांमध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे ग्रामीण व शिरगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या सात हजार ५३८ झाली असली, तरी त्यात सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ७७ आहे. त्यात ४२ जण लक्षणे असलेले व ३४ जण लक्षणे नसलेले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 96 percent patients are corona free in maval