PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सदस्यालाच मिळणार, हे निश्चित होते.
Abhishek Barne

Abhishek Barne

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सदस्यालाच मिळणार, हे निश्चित होते. यात संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे यांची नावे आघाडीवर होती. कोअर कमिटीने बहुमताने कस्पटे यांचे नाव निश्चित केले.

पण, काही स्थानिक कारभाऱ्यांची मुंबई वारी, प्रदेश नेतृत्वाची मनधरणी आणि गेल्या दोन दिवसांतील नाट्यमय घडामोडींनंतर बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (ता.२५) त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, शनिवारी (ता. २८) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com