पुणे मुंबई एक्स्प्रेसवर किवळे एक्झिटजवळ खासगी बस पलटली; 20-25 प्रवासी जखमी

Accident of private bus  at Pune-Mumbai Express near Kiwale exit
Accident of private bus at Pune-Mumbai Express near Kiwale exit
Updated on

देहू : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर किवळे एक्झिटजवळ खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. रविवारी(ता.27) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमधील वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले असून महामार्गालगतच्या जवळच्या विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईहून सांगली येथे साखरपुडा समारंभाला हे सर्वजण बसने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, ''मुंबईहून एका खासगी बसने( क्रमांक एमएच04 एफ के 37856)ने सांगलीकडे जात होते. किवळे येथे बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटली. बसमध्ये 40 जण असल्याची माहिती आहे. त्यापैकी वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत.

देहूरोड पोलिस, महामार्ग पोलिस आणि देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोचली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com