esakal | पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Scene

अटकेत असलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. तर दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घडला.

पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - अटकेत असलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. तर दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19 रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश बाबुराव पवार (वय 21,) , गणेश उर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय 19, दोघेही रा. नढेनगर, काळेवाडी ) अशी पळून जाण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या कस्टडी रिमांडमध्ये असलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणी व रक्ताचे नमुने घेण्यासाठी मंगळवारी (ता. 26) दुपारी एकच्या सुमारास पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणले होते. यावेळी आरोपी पवार व कांबळे यांनी येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर सोनवणे हा आरोपी पसार झाला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image