पवना धरणात पुरेसा पाणीसाठा

पुढील वर्षीच्या ३१ जुलैपर्यंतची चिंता मिटली; गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्के जादा पाणी
pavna dam
pavna damsakal

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला सहा टक्के जादा पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास पूर्ण भरत आले असून, त्यावर मदार असलेली मावळातील गावे, शेतकरी व उद्योगांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. शहरालाही पुरेसे पाणी उपलब्ध होणार असल्याने पुढील वर्षीच्या ३१ जुलैपर्यंतची चिंता मिटली आहे.

pavna dam
पिंपरीत चंदनाच्या सात झाडांची चोरी

पवना धरणातील पाणीसाठ्यावर पिंपरी-चिंचवड शहरासह औद्योगिक परिसर, पुण्यातील वाघोली परिसर, हिंजवडी आयटी परिसर आणि मावळातील पवना नदी परिसरातील गावे अवलंबून आहेत. महापालिकेसह एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क आणि वाघोली अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथे आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड पाणीपुरवठा योजनेचे अशुद्ध जलउपसा केंद्र मामुर्डीजवळ आहे.

शिवाय, मावळ तालुक्यातील अनेक गावे व शेतकरीही नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे पवना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या हायड्रोलिक यंत्रणेद्वारे पाणी सोडले जाते. नदी पात्रातून ते शहरापर्यंत येते. त्यामुळे शहरासह शेतीचीही तहान भागत आहे.

pavna dam
पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडला पुरेसे पाणी मिळावे किंवा ते वर्षभर पुरेल की नाही, यासाठी ३१ जुलैचा पाणीसाठा विचारात घेतला जातो. त्या दिवसाच्या पाणी साठ्यावरून वर्षभराचे नियोजन केले जाते. सद्यःस्थितीत पुरेसा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सहा टक्क्यांनी जादा असून ६१५ मिलिमीटरने पाऊस जादा झाला आहे.

मात्र, महापालिकेतर्फे ‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची कामे संथगतीने सुरू असून अधिकचे पाणी मिळण्यासाठीचे आंद्रा व भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचीही काम संथगतीने सुरू आहे. दोन्ही कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. डिसेंबरनंतर दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पाऊस मिलिमीटरमध्ये

गेल्या २४ तासांतील पाऊस- ३

एक जूनपासूनचा पाऊस- २०२७

गेल्या वर्षी २७ ऑगस्टपर्यंत पाऊस- १४१२

गेल्या वर्षाच्या तुलनेत जादा पाऊस- ६१५

पाणीसाठा टक्केवारी

धरणातील सध्याचा पाणीसाठा-९७.७३

गेल्या वर्षी २७ ऑगस्टचा पाणीसाठा-९१.७३

गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात वाढ-००

एक जूनपासून पाणीसाठ्यात वाढ-६६.१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com