जुनी सांगवीतील विकासकामांमध्ये प्रशासनाने लक्ष घालावे, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, प्रशासनाने लक्ष घालून कामे करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

जुनी सांगवी : येथील मुख्य रस्त्यांची खड्डे व चिखलामुळे दुरवस्था झाली आहे. सतत पडणाऱ्या पावासामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, प्रशासनाने लक्ष घालून कामे करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शितोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही आमच्या सत्ताकाळात मॉडेल वार्ड ही संकल्पना राबवून दर्जेदार रस्ते केले. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचा दर्जा चांगला असूनही परिसरात खोदकामे केली आहेत. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. आमच्या काळातीलच चोविस बाय सात पाणीपुरवठा योजना अनेक ठिकाणी व्यवस्थितरित्या राबविली जात नाही.

सिमेंट रस्ते करताना अनेक ठिकाणी चुकीची कामे होत असल्याने दुरुस्ती देखभालीसाठी अडचणी येणार आहेत. अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते करताना ड्रेनेज, पावसाळी पाणी, पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या आदींचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे भविष्यात अशा ठिकाणी अडचणी येऊ शकतात. आमचा विकास कामाला विरोध नाही. मात्र, चुकीची कामे होऊ नयेत, असे त्यांनी विवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration should attention to development work in old sangvi demanded by ncp