

surgery
पिंपरी - उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल घडत आहेत. काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य व कामगारवर्गाला आपल्या उपचारांसाठी केवळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएम) अवलंबून राहावे लागत होते. मात्र, सध्या महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहे.