

Pimpri Chinchwad Municipal Corporation
esakal
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात महापालिकेत भ्रष्टाचार, दहशत आणि सत्तेचा माज वाढल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे देखील कौतुक केले. पिंपरीच चिंचवडचा विकास फक्त शरद पवार यांनी केल्याचा दाखला अजित पवारांनी दिला.