Ajit Pawar
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी प्रचाराचा समारोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला पुन्हा लक्ष करत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर डाव टाकून असा फिरवून टाकेन, घुटनाचित कसे करायचे? मला माहिती आहे. मी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचा अध्यक्ष आहे, हे विसरू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला.