esakal | आकुर्डी : लष्कर भरती पुन्हा लांबणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

indian army

आकुर्डी : लष्कर भरती पुन्हा लांबणीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने आम्ही लष्करात जायचे की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी सप्टेंबर महिन्यात भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

ही भरती प्रक्रिया सोल्जर पदासाठी पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी होणार होती. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडणार होती. पण, पुन्हा एकदा भरती प्रक्रियेत अडथळा आल्याने ती लांबणीवर गेली. त्यामुळे लष्कर भरतीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

‘‘भारत देशाला एवढी गरज असून देखील आमची भरती का होत नाही? नेमकं काय कारण आहे. त्यामागे आम्ही कित्येक वर्षांपासून तयारी करत आहोत. आमची भरती कधी होणारच नाहीये का?

- प्रज्वल चव्हाण (विद्यार्थी)

‘‘सप्टेंबरमधील भरतीची तारीख जाहीर झाल्यावर आम्ही आशेचा किरण म्हणून त्या दिवसाकडे पाहत होतो. आतातरी आमची भरती होईल, या अपेक्षेने पुन्हा जोमाने तयारीला लागलो होतो. पण, परत भरती लांबणीवर गेल्यामुळे आम्ही काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला आहे

- शुभम दौंड (विद्यार्थी)

‘‘आमचं वय निघून गेल्यावर आम्ही परीक्षा सुद्धा देऊ शकणार नाही. मग करायचं तरी काय? अजून किती दिवस आम्हाला वाट पहावी लागणार आहे.

- ओंकार वळसे (विद्यार्थी)

‘‘सगळ्या गोष्टी चालू होत आहेत. वेगवेगळ्या परीक्षाही घेतल्या जात आहेत. मग लष्कर भरती का होत नाहीये? यामुळे आमच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला आहे. आत्मविश्वास खचत आहे. आमची पूर्ण तयारी झाली आहे. पण, तुम्ही भरती कधी घेणार?

- हर्षदा फुगे (विद्यार्थिनी)

loading image
go to top