
अमोल शित्रे
पिंपरी : ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत आकुर्डी आणि निगडी प्राधिकरणात अत्याधुनिक पद्धतीने रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांकडेला अत्याधुनिक दर्जाचे पदपथ महापालिका विकसित करत आहे. बाजूलाच सायकल ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठा, वीजबिल भरणा केंद्र, रेल्वे स्टेशन, शाळा, रुग्णालये, पोस्ट कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात सायकलवर किंवा चालत जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासह प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.