esakal | Akurdi : सजावटीसाठी तोरण, फुलांना पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Akurdi : सजावटीसाठी तोरण, फुलांना पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद अन् उत्साहाचे वातावरण असते. तोच उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी गणरायाची आरास केली जाते. गौरी-गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या नवीन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत.

गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, तोरणे, दिवे, मोती, जाळीचे पडदे, पेपर कटआऊट, कार्डबोर्ड, फोम शीट, क्रेप पेपर, लटकन अशा विविध नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आणि मुकुटही पाहायला मिळत आहेत. तसेच, सजावटीसाठी सर्वांत जास्त वापर फुलांचा केला जातो. त्यामुळे पेपरपासून बनवलेल्या फुलांना जास्त मागणी आहे.

दागिने

गणपतीसाठी काही ज्वेलर्सनी खास कलेक्शन बाजारात आणले आहे. त्यामध्ये मुकुट, सोंड, मोदक हार, समई, जास्वंद, केवड्याचे पान, पान-सुपारी, दूर्वा आणि त्रिशूळ तसेच, ग्राहकांना आवडतील अशाच आकारातील चांदी आणि सोन्याचं पाणी दिलेल्या विविध आकारांतील मूर्तीदेखील आहेत. या मूर्ती देव्हाऱ्यातही ठेवता येतील.

छत्री

बाप्पाच्या डोक्यावर लावण्यासाठी जी छत्री असते, त्यातही वेगवेगळ्या आकार व किमतीत छत्री उपलब्ध आहेत. त्याची किंमत सुमारे ९०, १२०, १५० रुपयांपासून सुरू होते.

फेटा

कृष्ण पगडी, शाही फेटा, जय मल्हार पगडी, कोल्हापुरी फेटा, स्वामिनारायण फेटा, पुणेरी फेटा अशा विविध प्रकारचे फेट्यांना यंदा मोठी मागणी आहे. ५० पासून ते पाचशे रुपयांपर्यंत या फेट्यांची किंमत आहे.

तोरण

मोती, लोकर, एम्ब्रॉयडरी केलेली, फुलांची अनेक तोरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ९० पासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय पडद्यांमध्येही विविध प्रकार आहेत. रंगीबिरंगी, मणी व जाळीच्या पडद्यांचा समावेशआहे.

विक्रेते म्हणतात

मनोज वनवारी (सजावट साहित्य विक्रेते) : या वर्षी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यात सजावटीच्या साहित्यातील पेपरपासून बनवलेल्या फुलांना जास्त मागणी आहे. यंदा फेट्यांचे विविध प्रकारही विक्रीस आले आहेत.

नीलेश वर्मा (सराफ व्यावसायिक) : गेल्या दोन वर्षांपासून आमचा व्यवसाय कमी प्रमाणात चालत होता. मात्र, गणेशोत्सवामुळे व्यवसाय उत्तम चालत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ५० टक्के सूटदेखील दिली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

loading image
go to top