मुळशी धरणातून विसर्ग वाढला; नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

Alert to Citizen of mulshi river bank
Alert to Citizen of mulshi river bank

पिंपरी : गेल्या आठवड्यापासून शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाने शनिवारी (ता. 22) सकाळीच हजेरी लावली. कुठे हलक्‍या सरी तर कुठे रिमझिम पाऊस बरसत होता. अशाच वातावरणात अनेक भाविक गणेश मूर्ती घरी आणण्यासाठी विक्रेत्यांकडे गेले व मूर्ती घेऊन आले. साधारणतः अकरानंतर पाऊस थांबला, मात्र, त्यानंतर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. दुपारी एकनंतर कधी पावसाची सर, कधी सूर्यदर्शनामुळे ऊन, तर कधी केवळ ढगांमुळे सावली असे वातावरण अधून-मधून अनुभवायला मिळाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर परिसरासह मावळ व मुळशी तालुक्‍यातही पाऊस सुरू आहे. मुळशी धरणातून शुक्रवारी (ता. 21) सकाळी दहापासून बारा हजार क्‍युसेकने मुळा नदीत विसर्ग सुरू केला होता. शनिवारी सकाळी आठपासून तो सात हजार 300 क्‍युसेक करण्यात आला आहे. मात्र, पर्जन्यमानानुसार त्यात वाढ केली जाईल, असे धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी कळविले आहे. दरम्यान, मुळशी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी येथील नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा महापालिकेने दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गावांना असतो धोका 
मुळा नदी मुळशी तालुक्‍यातून येऊन वाकड व बाणेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. येथून पुढे त्यांची ओळख मुळा-मुठा अशी होते. मुळा नदीला पूर आल्यानंतर वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, कळस, खडकी, बोपोडी, औंध, बाणेर या गावांच्या नदीकाठच्या भागांना धोका असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com