

PCMC Election
Sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे जागावाटपाबाबत तळ्यात-मळ्यात सुरू आहे. उमेदवारी याद्यादेखील प्रसिद्ध झाल्या नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी मिळणार का, याबाबत त्यांच्यात धाकधूक वाढली आहे.