Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास अभियान

आमदार आण्णा बनसोडे यांच्या विशेष सहयोगातून उपक्रम
Ambedkar Jayanti 2023 18 hours continuous study campaign mla anna bansode
Ambedkar Jayanti 2023 18 hours continuous study campaign mla anna bansodesakal
Updated on

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सलग १८ तास स्पर्धा परिक्षेंच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. १३) अभ्यास अभियान राबविण्यात आले. हे अभियान पुण्यातील टिबीएसएम संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी दापोडी येथे आयोजित केले होते. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विशेष सहयोगातून व मार्गदर्शनाखाली डॉ. आंबेडकर यांना ही आगळीवेळगी मानवंदना देण्यात आली.

स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनि सकाळी ६ ते रात्रौ १२ पर्यत सलग १८ तास अभ्यास करून ही मानवंदना डॉ. आंबेडकर यांना दिली.

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण व रात्री ८ वाजता अल्पउपहार यावेळी देण्यात आला. हा उपक्रम फक्त एक दिवस न साजरा होता विद्यार्थ्यांना यश मिळत नाही तोपर्यत अभ्यासाची सवय अंगिकारावी असे आवाहन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक रवींद्र भगत, केंद्र प्रमुख निखिल आकाडे, उपकेंद्र प्रमुख निलेश भगत यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रति असलेले प्रेम आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी सलग १८ तास अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमीक्स मधून आपली अर्थशास्त्र विषयातली पीएचडी पदवी वेळ अगोदर पूर्ण केली होती व याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी हा उपक्रम राबविला आहे.

- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com