Pimpri midc industry
sakal
पिंपरी - अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाचा जबर फटका भारतीय उद्योगांनाही बसला आहे. तयार उत्पादन १५ दिवसांपूर्वी पाठवले, ते निश्चित ठिकाणी पोहचलेले नाही. पैसे भरूनही कच्च्या मालासह ॲल्युमिनियम, कॉपर अशा धातूंचा तुटवडा जाणवत आहे. तयार उत्पादने पडून आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा थांबविल्यामुळे उद्योजक सर्व बाजूंनी अडचणीत आले आहेत.