
पिंपरी : पीएमपी बस आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. दोन्ही बसमध्ये प्रवासी नव्हते. हा अपघात निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात सोमवारी (ता. ४) पहाटे झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या चौकात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. ते रोखण्यासाठी पोलिस आणि महापालिकेने संयुक्त उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.