esakal | काळेवाडीत झालेल्या 'त्या' हल्ल्यातील आणखी एका महिलेचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

काळेवाडीत झालेल्या 'त्या' हल्ल्यातील आणखी एका महिलेचा मृत्यू 

घरात शिरलेल्या हल्लेखोराने झोपेत असलेल्या दोन महिलांवर हत्याराने हल्ला केल्याची घटना काळेवाडीत 16 ऑक्‍टोबरला घडली.

काळेवाडीत झालेल्या 'त्या' हल्ल्यातील आणखी एका महिलेचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : घरात शिरलेल्या हल्लेखोराने झोपेत असलेल्या दोन महिलांवर हत्याराने हल्ला केल्याची घटना काळेवाडीत 16 ऑक्‍टोबरला घडली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी होती. या महिलेचाही उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 27) मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगल साहेबराव सत्वधर (वय 48, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी, मूळ-बीड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच, छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50) असे यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी छाया गुंजाळ यांच्या मुलाने फिर्याद दिली. 16 ऑक्‍टोबरला पहाटे चारच्या सुमारास फिर्यादीची आई छाया गुंजाळ, सासू मंगल सत्वधर, वडील पांडुरंग गुंजाळ व आजी सुंदराबाई भानुदास गुंजाळ हे घराच्या हॉलमध्ये झोपले होते. फिर्यादीची आजी सुंदराबाई या नेहमीप्रमाणे पहाटे चारच्या सुमारास घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून भाजी विक्रीसाठी गेल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, उघड्या दरवाजावाटे अज्ञात व्यक्ती घरात शिरला. त्याने हत्याराने छाया गुंजाळ यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर छाया यांच्या शेजारीच झोपलेल्या मंगल सत्वधर यांच्यावरही हल्ला केला. त्यात त्याही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. घटनेला तेरा दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.